सुप्रिया सुळेंचा मॉर्निंग वॉक अन् सुनेत्रा पवार यांच्या हाती क्रिकेटची बॅट ! बारामतीच्या उमेदवारांची सन्डे सकाळ अशी घालवली ..!!
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. नणंद- भावजय अशी लढत असली तरीही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत पाहायला मिळते आहे.
या लोकसभा मतदार संघात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात रोज वेगवेगळ्या मुद्यांवरुन सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहे. त्यातच नणंद भावजय आपला मतदार संघातील प्रत्येक भाग पिंजून काढताना दिसत आहे. आज सुप्रिया सुळेंनी तळजाई टेकडीवर मॉर्निग वॉक करत प्रचाराला सुरुवात केली तर दुरीकडे सुनेत्रा पवारांनी थेट क्रिकेटची बॅट हाती घेत प्रचाराला सुरुवात केली. दोघींचाही दणक्यात प्रचार सुरु आहे आणि शाब्दिक सिक्सरदेखील उडवताना दिसत आहेत.
सुप्रिया सुळेंनी आजच्या प्रचाराची सुरुवात पुण्यातील तळजाई टेकडीवर मॉर्निग वॉक करत केली. त्यांनी मार्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर अनेकांसोबत फोटोसेशनदेखील केलं. सुप्रिया सुळे सध्या सगळ्या स्थरातील लोकांच्या भेटी घेत आहेत. सगळ्यांची संवाद साधत मतदानाचं आवाहन करताना दिसत आहे. याच प्रचारादरम्यान त्या अजित पवारांवर टीका करताना दिसत आहेत.महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांनीदेखील प्रचारासाठी चांगलीच कंबर कसली आहे.
त्यादेखील मतदारसंघ काढाताना दिसत आहेत. रोज नव्या लोकांच्या भेटी घेताना दिसत आहे. त्यातच आज आंबेगावमध्ये प्रचार दौ-यावर असताना लेक विस्टा सोसायटीमध्ये रविवार असल्यामुळे सर्व नागरिक क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होते. त्याचवेळी सुनेत्रा वहिनी प्रचारासाठी तेथे पोहोचल्या असता सर्व नागरिकांनी त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला. त्यांनी नागरिकांच्या आग्रहाला मान देत चक्क बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरल्या व विजयाचे चौकार व षटकार लगावले. तसेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती काबीज करण्यासाठी दोन्ही पवार कामी लागले आहेत. सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यासाठी अख्ख कुटुंब मैदानात उतरलं आहे. त्यासोबतच शरद पवारदेखील सभा घेणार आहेत. सगळं पवार कुटुंब अजित पवारांच्या विरोधात असलं तरीही अजित पवार स्वत: सगळीकडे सभा घेताना दिसत आहेत. येत्या काळात बारामती नेमकं कोणते पवार काबीज करणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.