Baramati : एससी, एसटी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात ‘बारामती बंद’ ची उद्या हाक, जाणून घ्या..


Baramati : एससी, एसटी समाजाच्या आरक्षणाला क्रिमीलेयर लावण्याचा व त्याचे वर्गीकरण करण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकारला देत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय एससी एसटी समाजात फूट पडणारा व त्यांची एकता तोडणारा असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णया विरोधात बुधवारी (ता. २१) देशभरातील एससी, एसटी समाजाने भारत बंद ची हाक दिली आहे.

त्या पार्श्वभूमीवर बारामतीतील एससी एसटी समाजाच्या वतीने या भारत बंदला समर्थन देण्यासाठी बुधवारी बारामती बंदचे आवाहन करण्यात आले असून निषेध मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान बारामती व्यापारी महासंघाने देखील दुपारी दोन पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. Baramati

दरम्यान, दुसरीकडे भारत बंदला समर्थन देण्यासाठी निषेध मोर्चा देखील काढला जाणार आहे. हा निषेध मोर्चा सकाळी १० वाजता आमराईतील सिद्धार्थनगर येथून सुरु होणार असून मुख्य बाजारपेठेतून पुढे जात तीनहत्ती चौक या ठिकाणी निषेध सभेने या मोर्चाची सांगता होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!