सकल धनगर समाजाच्या वतीने आज बारामती बंद !

बारामती : धनगर समाजाच्या वतीने आज बंदची हाक देण्यात आली आहे. धनगर आरक्षणासाठी बारामतीत सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर 50 दिवसांचा कालावधी देऊनही राज्य सरकारने कार्यवाही न केल्याने समाजाच्या वतीने बारामती बंद पुकारला आहे.
बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर धनगर समाजातील कार्यकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांचे आमरण उपोषणास बसले आहे.राज्य सरकारने धनगर आरक्षणासाठी !50 दिवसांचा कालावधी देऊन 16 नोव्हेंबरला कालावधी संपत आहे. मात्र राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन बारामती बंदचा इशारा दिला आणि आज बारामती बंद पुकारला आहे.
धनगर समाजाचा अनुसूचित जाती मध्ये सामावेश करावा अशी समाजाची मुख्य मागणी आहे.
Views:
[jp_post_view]