Baramati : बारामतीत भयंकर प्रकार! वीज बिल जास्त येते म्हणून मोरगावमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, महिलेचा दुर्दैवी मृत्यू, घटनेने राज्यात खळबळ
Baramati बारामती : मीटर रीडिंग तपासावे अशी सातत्याने मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने एका वीज ग्राहकाने महावितरणच्या टेक्निशियन महिलेवर चक्क कोयत्याने वार केलेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
रिंकू राम थिटे असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे. ही महिला कोयत्याने गंभीर वार झाल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाली होती.
या महिला कर्मचाऱ्यास पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलीस सूत्राने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने महावितरण मध्ये मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी आरोपी अभिजीत पोते याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. अभिजीत पोते हा महावितरणचा वीज ग्राहक असून त्याच्या घरातील विज बिल सातत्याने जास्त येते अशी तो तक्रार करत होता.
माझ्या घराचे वीज बिल मीटरचे रीडिंग घेऊन हे बिल का जास्त येते हे पहा असे तो सातत्याने सांगत होता, मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे त्याला वाटल्याने त्याने चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यामध्ये रिंकू राम थिटे ही तांत्रिक कर्मचारी महिला त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने तिच्यावर कोयत्याने वार केले. Baramati
दरम्यान, अचानक झालेल्या या हल्ल्यात रिंकू थिटे यांना प्रतिकार करण्याची ही संधी मिळाली नाही. तसेच त्या स्वतःला वाचवूही शकल्या नाहीत. यामध्ये कोयत्याचे वार वर्मी लागल्याने रिंकू या गंभीर जखमी झाल्या. ‘
त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले, मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली.