Baramati : बारामतीत धक्कादायक प्रकार! वीज बिल जास्त येते म्हणून मोरगावमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, थरारक घटनेने सगळेच हादरले…


Baramati  : गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामतीतील मोरगावमध्ये धक्कादायक घटना घडली असून वीज बिल जास्त येते, मीटर रीडिंग तपासावे अशी सातत्याने मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने एका वीज ग्राहकाने महावितरणच्या टेक्निशियन महिलेवर चक्क कोयत्याने वार केले आहेत.

ही महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान संशयित आरोपी अभिजीत पोते याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. ही घटना आज सकाळी ११ च्या सुमारास घडली.

अभिजीत पोते हा महावितरणचा वीज ग्राहक असून त्याच्या घरातील विज बिल सातत्याने जास्त येते अशी तो तक्रार करत होता. माझ्या घराचे वीज बिल मीटरचे रीडिंग घेऊन हे बिल का जास्त येते हे पहा असे तो सातत्याने सांगत होता, मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे त्याला वाटल्याने त्याने चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. Baramati

दरम्यान, यामध्ये रिंकू राम थिटे ही तांत्रिक कर्मचारी महिला त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने तिच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या घटनेने रिंकू थिटे ही महिला कर्मचारी देखील घाबरली, मात्र तोपर्यंत अभिजीत पोते याने तिच्यावर वार केले होते. ती यात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!