कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बापूसाहेब बोधे बिनविरोध..

उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बापूसाहेब यशवंत बोधे यांची बुधवारी (ता. 04) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच भानुदास जेधे यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने मंडलाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा बागले यांच्या अध्यक्षतेखाली व गोरख कानकाटे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

या निवडणुकीत सरपंच पदासाठी बापूसाहेब बोधे यांचा एकमेव अर्ज आल्याने मनीषा बागले यांनी बापूसाहेब बोधे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. बापूसाहेब बोधे यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी करीत मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी उषा मुंडे , ग्रामपंचायत अधिकारी स्वाती राजगुरू यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

यावेळी माजी सरपंच मंगेश कानकाटे, विठ्ठल शितोळे, उपसरपंच पल्लवी नाझीरकर, सदस्य दत्तात्रय काकडे, लिलावती बोधे, वैशाली सावंत, राधिका काकडे, मनीषा कड, अश्विनी कड, सामाजिक कार्यकर्ते सोपान शितोळे, मानसिंग कड, आप्पासाहेब कड, बाजीराव कड,ताराचंद कोलते, रमेश नाझीरकर,प्रवीण शितोळे, आप्पासाहेब कड,अमित सावंत दिलीप शितोळे, संतोष गायकवाड, जयसिंग भोसले, सुनील खेडेकर, प्रवीण शितोळे, गणेश शितोळे, संतोष शितोळे, विठ्ठल कोलते, सुरज बोधे, तेजस बोधे, स्वप्निल बोधे, लोकेश कानकाटे, निखिल कड, आदी समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, 1979 पासून बापूसाहेब बोधे हे ग्रामपंचायतीत पहिल्यांदा सदस्य म्हणून निवडून आले होते. तसेच मागील दोन निवडणुकीत उपसरपंचपदी निवड झाली होती. मात्र 2025 साली त्यांची स्वप्नपूर्ती होऊन पाहिल्यांदा सरपंचपदी विराजमान झाले आहेत. याअगोदर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक , पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही कामजाज पाहिले आहे.
नवनिर्वाचित सरपंच बापूसाहेब बोधे निवडीनंतर म्हणाले, “गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. कोरेगाव मूळ गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
