‘आमचंही ठरलंय धडा कसा शिकवायचा’; ब्राम्हण समाज संतप्त…!


पुणे : भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे.या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. मात्र कसब्यात टिळक परिवारातील सदस्याला उमेदवारी न मिळाल्याने ब्राह्मण समाजाच्या नाराजीचा सामनाही भाजपला करावा लागतोय.

भाजप नेते हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर मोठी नाराजी उफळल्याचं चित्र आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातांकडून बॅनरबाजी केली जात आहे.

पुण्यातील मोदी गणपतीजवळ अज्ञातांकडून बॅनर लावण्यात आला आहे. त्यात म्हटलंय की आमचंही ठरलंय धडा कसा शिकवायचा. कसबा हा गाडगीळांचा, कबसा हा बापटांचा, कसबा टिळकांचा. का काढला आमच्याकडून कबसा?. आम्ही दाबणार NOTA, असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आलाय.

दरम्यान, याआधीही कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. त्यापूर्वीच कसब्यात ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? असा सवाल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!