कामाची बातमी! मार्चमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद, आत्ताच तपासा सुट्ट्यांची यादी..

पुणे : आर्थिक वर्ष 2025-26 चा अखेरचा महिना असलेला मार्च आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. फेब्रुवारी महिना संपायला अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यानंतर सुरू होणारा मार्च महिना आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

या काळात बँकांमध्ये व्यवहारांची मोठी गर्दी असते. मात्र सण आणि सार्वजनिक उत्सवांमुळे देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आर्थिक कामांचे नियोजन आधीच करणे आवश्यक ठरणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या अधिकृत कॅलेंडरनुसार मार्च 2026 मध्ये विविध राज्यांमध्ये सण-उत्सवांमुळे बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्ट्या सर्व राज्यांत समान नसून स्थानिक सणांनुसार बदलतात. काही दिवशी देशभर बँका बंद राहतील, तर काही ठिकाणीच कामकाज थांबेल.

मार्च महिना हा आर्थिक वर्ष संपण्याचा काळ असल्याने या काळात बँकांमध्ये कामाचा मोठा ओघ असतो. मात्र, याच महिन्यात होळी, गुढीपाडवा आणि ईद यांसारखे मोठे सण येत असल्याने बँकांना अनेक सुट्ट्या आहेत. हे लक्षात घेऊन ग्राहकांनी आपले बँकेशी संबंधित चेक क्लिअरिंग किंवा इतर महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
मार्च 2026 मधील सुट्ट्यांची सविस्तर यादी…
1 मार्च – रविवार असल्याने देशभर बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
2 मार्च – होलिका दहनानिमित्त विविध राज्यांत सुट्टी राहील.
3 मार्च – धुलिवंदनामुळे बँकांचे कामकाज बंद असेल.
4 मार्च – होळीच्या दुसऱ्या दिवशी नवी दिल्ली, चंदीगड, कानपूर, अहमदाबाद यांसह अनेक शहरांत बँका बंद राहतील.
13 मार्च – चपचार कुट या स्थानिक सणामुळे ऐझवालमध्ये सुट्टी असेल.
17 मार्च – शब-ए-कद्र निमित्त काही राज्यांत बँका बंद राहतील.
19 मार्च – गुढीपाडवा, तेलगू नववर्ष आणि पहिली नवरात्री असल्याने महाराष्ट्र, नागपूर, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद येथे बँका बंद राहतील.
20 मार्च – ईद-उल-फित्र (रमजान) आणि जुमात-उल-विदा निमित्त जम्मू, श्रीनगर आणि केरळमध्ये सुट्टी असेल.
21 मार्च – रमजान-ईद (ईद-उल-फित्र) निमित्त देशभरात सुट्टी असण्याची शक्यता आहे.
26 मार्च – रामनवमीच्या निमित्ताने अनेक राज्यांत बँका बंद राहतील.
27 मार्च – रामनवमीच्या उत्तरार्धात भोपाळ, पाटणा, भुवनेश्वर यांसारख्या ठिकाणी बँकांना सुट्टी असेल.
31 मार्च -महावीर जयंती निमित्त नवी दिल्ली, मुंबई (बेलापूर), जयपूर आणि कानपूरमध्ये बँका बंद राहतील.