कामाची बातमी! एप्रिल महिन्यात १४ दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या तारखांची संपूर्ण यादी…

पुणे : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात बँकांचे कामकाज विविध कारणांमुळे एकूण १४ दिवस बंद राहणार आहे.

त्यामुळे एप्रिलमध्ये तुम्ही बँकेत कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल, तर बँका कोणत्या दिवशी सुरू आणि कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत, याची आधीच माहिती घेणे आवश्यक ठरेल. Reserve Bank of Indiaने जारी केलेल्या यादीनुसार, रविवार तसेच दुसरा आणि चौथा शनिवार यांसोबतच विविध सणांमुळे एप्रिलमध्ये बँका जवळपास १४ दिवस बंद राहणार आहेत.
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १ एप्रिलला देशभरातील बँका ग्राहकांसाठी बंद राहणार आहेत. या दिवशी बँक कर्मचारी कार्यालयात उपस्थित असतील, मात्र ग्राहकांसाठी कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत. हा दिवस बँकांच्या वार्षिक खाते बंद करण्यासाठी राखीव ठेवला जातो. त्यामुळे या दिवशी चेक क्लिअरिंग, तसेच काऊंटरवरून पैसे जमा किंवा काढण्यासारखी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही.

एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्टीची यादी पुढील प्रमाणे…
१ एप्रिल : वार्षिक कामकाज क्लोजिंगमुळं बँका देशभर बंद असतील.
२ एप्रिल : पुण्य गुरुवार निमित्त कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
३ एप्रिल : गुड फ्रायडे निमित्त बँका देशभर बंद
५ एप्रिल : रविवार निमित्त सर्व बँका बंद असतील.
११ एप्रिल : दुसरा शनिवार, सर्व बँका बंद
१२ एप्रिल : रविवारनिमित्त सर्व बँका बंद
१४ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इतर सनांच्या निमित्तानं बँकांना सुट्टी
१५ एप्रिल : बंगाली नववर्ष दिवस, यासह इतर सनांमुळं आगरताळा, गुवाहाटी, ईटानगर, कोची, कोलकाता, शिमला, तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
१६ एप्रिल : बोहाग बिहू निमित्त गुवाहाटीत बँका बंद
१९ एप्रिल : देशातील सर्व बँका रविवार निमित्त बंद असतील.
२० एप्रिल : अक्षय तृतीया आणि बसव जयंतीनिमित्त बंगळुरु आणि इतर ठिकाणी बँका बंद असतील.
२१ एप्रिल : गारिया पूजेनिमित्त बँका आगरताळामध्ये बंद असतील.
२५ एप्रिल : चौथ्या शनिवारी बँका बंद असतील.
२६ एप्रिल : रविवार असल्यानं साप्ताहिक सुट्टी