जुलै महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची पूर्ण यादी…

नवी दिल्ली : बँक हा आपल्या आयुष्यातील कधीही न वगळला जाणारा विषय आहे. आजकाल मोबाईल वरून बँकेची कितीही कामे ऑनलाईन होत असली तरी बँकेत कोणत्या ना कोणत्या कारणाने जावं लागतच. कर्ज काढायचं असेल, मोठी रक्कम जमा करायची असेल किंवा चेकबुक संदर्भात काही काम असेल तर बँकेत जाणे गरजेचं बनतं.
तसेच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुलै २०२५ मधील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद राहणार असून, यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, तसेच राज्यानुसार साजरे होणारे स्थानिक सण-उत्सव यांचा समावेश आहे.
दरम्यान, अनेक व्यवहार आज डिजिटल स्वरूपात सहज होतात, मात्र केवायसी अपडेट, रोकड व्यवहार, लॉकर सेवा, खाते बंद करणे यांसारखी कामे बँकेतच जाऊन करावी लागतात. त्यामुळे कोणत्या दिवशी बँक चालू आहे हे जाणून घेणे आवश्यक ठरते.
जुलै २०२५ मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी खालील प्रमाणे..
3 जुलै (बुधवार) – त्रिपुरा: खारची पूजा
5 जुलै (शनिवार) – जम्मू व श्रीनगर: गुरु हरगोबिंद जयंती
6 जुलै (रविवार) – देशभर सुट्टी
12 जुलै (शनिवार) – दुसरा शनिवार, देशभर सुट्टी
13 जुलै (रविवार) – देशभर सुट्टी
14 जुलै (सोमवार) – मेघालय: बेह दिनखलाम सण
16 जुलै (बुधवार) – उत्तराखंड: हरेला सण
17 जुलै (गुरुवार) – मेघालय: यू तिरोट सिंग स्मृतिदिन
19 जुलै (शनिवार) – त्रिपुरा: केर पूजा
20 जुलै (रविवार) – देशभर सुट्टी
26 जुलै (शनिवार) – चौथा शनिवार, देशभर सुट्टी
27 जुलै (रविवार) – देशभर सुट्टी
28 जुलै (सोमवार) – सिक्कीम: द्रुकपा त्शे-जी पुण्यतिथी