रात्री ११ ला बँक चालू, बँकेत सभासदांच्या याद्या, बँकेत अजित पवार, दत्तात्रय भरणे यांच्या जवळचे लोकं, माळेगावच्या निवडणुकीत वातावरण तापलं..


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अनेक घडामोडी घडत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या आठ दिवसांपासून येथे तळ ठोकून आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील आमराई परिसरात असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank) ही काल रात्री तब्बल ११ वाजेपर्यंत उघडी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच याच ठिकाणी मतदारांच्या याद्या सापडल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. बँकेची वेळ ही पाचपर्यंत असते. रात्री ११ वाजेपर्यंत ही बँक उघडी का होती? तिथे केवळ माळेगाव साखर कारखान्याच्या नव्हे, तर सहकारी संस्था आणि शिक्षण संस्थांच्या मतदार याद्याही सापडल्या. त्यावर कोणाच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, याचे तपशील नमूद होते.

ही बाब अत्यंत संशयास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार यांनी यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी माहिती दिली. सध्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने सर्वसामान्य सभासदांसाठी निवडणूक कठीण झाली आहे. हे राजकारण बदललं पाहिजे. सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते रंजन तावरे यांनी पोलिसांसमोर उपस्थित राहून जाब विचारला.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे त्या परिसरात गाडीतून जाताना दिसल्याचे सांगितले जात आहे. तसेच मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकाऱ्यांचीही उपस्थिती होती, असेही सांगितले आहे. विरोधकांकडून पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून पैशांचे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

यामुळे बारामतीत राजकारण पुन्हा तापलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनीही घटनास्थळी हजेरी लावली. सध्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. PDCC बँकेच्या व्यवस्थापनावर तसेच निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सहकार क्षेत्रातील पारदर्शकता आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!