Bank Holiday : ‘जून’ महिन्यात ‘या’ दिवशी बँका राहणार बंद! बँकेतील कामे उरकून घ्या…


Bank Holiday : आजच्या काळात बँकांशी संबंधित अनेक कामे ऑनलाईन केली जातात. तरीही बँकेची अशी कामे असतात जी बँकेत जाऊनच पूर्ण केली जातात. या साठी बँकेच्या शाखेत जावे लागते. जून महिन्यात १० दिवस सुट्टी असणार आहे.

त्यामुळे सुट्टी कधी आहे ते तपासून घ्यावे. बँकेला सुट्ट्या कधी आहेत हे आधीच जाणून घ्या. दर आठवड्याच्या रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते. Bank Holiday

नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण जून महिन्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. नेमक्या किती सुट्ट्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया.

‘या’ दिवशी बंद असणार बँक..

2 जून 2024 – रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
8 जून 2024 – दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
9 जून 2024 – रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
15 जून 2024: भुवनेश्वर आणि आयझॉल झोनमध्ये YMA दिवस किंवा राजा संक्रांतीमुळे बँका बंद राहतील.

16 जून 2024 – रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
17 जून 2024 – बकरी ईदमुळे देशभरातील बँका जवळपास बंद राहतील.
21 जून 2024 – रोजी शुक्रवार आहे. या दिवश वटसावित्री वृत्त आहे. त्यामुळे अनेक राज्यांत या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे.

22 जून 2024: चौथ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.
23 जून 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
30 जून 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!