Bank Holiday : ऑगस्ट महिन्यात बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी! महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या, जाणून घ्या वेळापत्रक…
Bank Holiday : ऑगस्ट महिन्यात विविध सण येतात. या महिन्यांत स्वातंत्र्य दिनासह अनेक उत्सव ही साजरे होतात. १५ ऑगस्टसह या महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे.
तर विविध सणांमुळे बँकांना पण ताळे असेल. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन तर २६ ऑगस्टला जन्माष्टमीच्या निमित्ताने बँकाचे कामकाज बंद असेल. ऑगस्ट महिन्यात या दिवशी सुट्यांचा मुक्काम असेल. Bank Holiday
ऑगस्ट महिन्यात या दिवशी बँकांना ताळे…
३ ऑगस्ट – केर पूजा (आगरतळा)
४ ऑगस्ट – रविवार (देशभरात)
८ ऑगस्ट – तेंदोंग लो रमफात (गंगटोक)
१० ऑगस्ट – दुसरा शनिवार (देशभरात)
११ ऑगस्ट – रविवार (देशभरात)
१३ ऑगस्ट – देशभक्त दिवस (इम्फाळ)
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन (देशभरात)
१८ ऑगस्ट – रविवार (देशभरात)
१९ ऑगस्ट – रक्षाबंधन (अहमदाबाद, जयपुर, कानपुर, लखनऊ आणि अन्य ठिकाणी)
२० ऑगस्ट – श्री नारायण गुरु जयंती (कोच्चि, तिरुवनंतपुरम)
२४- २५ ऑगस्ट – चौथा शनिवार-रविवार (देशभरात)
२६ ऑगस्ट – जन्माष्टमी (देशभरात).