Bank holiday : सप्टेंबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, इतक्या दिवस राहणार बँका बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी…


Bank holiday : सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होत आहे. तसंच, अनेक सणदेखील आहेत. तसंच, या संपूर्ण महिन्यात बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या दिवशी सुट्टी असणार आहे, याची बँक हॉलिडे लिस्ट जाहीर केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडर २०२४ नुसार, भारतातील विविध क्षेत्रांमधील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सप्टेंबरमध्ये एकूण १५ दिवस बंद राहतील. Bank holiday

सुट्ट्यांनी होणार आहे, कारण रविवार १ सप्टेंबर रोजी रविवार असून साप्ताहिक सुट्टी असल्याने देशातील बँक शाखा बंद असणार आहे. त्यामुळे तुमची बँकाची काही कामं असतील तर ते पटापट उरकून घ्या..

या दिवशी असेल बँका बंद…

१ सप्टेंबर- रविवारची सुट्टी
४ सप्टेंबर- श्रीमंत शंकरदेवाची तिरुभव तिथीची सुट्टी (गुवाहाटी)
७ सप्टेंबर- गणेश चतुर्थी (जवळपास भारतातील संपूर्ण बँकांना सुट्टी असणार)
८ सप्टेंबर- रविवारची सुट्टी
१४ सप्टेंबर- दुसरा शनिवारची सुट्टी, पहिला ओणम (कोची, रांची आणि तिरुवनंतपुरम)
१५ सप्टेंबर- रविवारची सुट्टी
१६ सप्टेंबर- बारावाफट (जवळजवळ संपूर्ण भारतातील बँकांना सुट्टी असणार)
१७ सप्टेंबर- मिलाद-उन-नबीची सुट्टी (गंगटोक आणि रायपूर)
१८ सप्टेंबर- पंग-लाहबसोलची सुट्टी (गंगटोक)
२० सप्टेंबर- ईद-ए-मिलाद-उल-नबीची सुट्टी (जम्मू आणि श्रीनगर)
२२ सप्टेंबर- रविवारची सुट्टी
२१ सप्टेंबर- श्री नारायण गुरु समाधी दिवसची सुट्टी (कोची आणि तिरुवनंतपुरम)
२३ सप्टेंबर- महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिनची सुट्टी (जम्मू आणि श्रीनगर)
२८ सप्टेंबर- चौथा शनिवारची सुट्टी
२९ सप्टेंबर- रविवारची सुट्टी

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!