Bangladesh protest : बांगलादेशमध्ये हिंसा सुरू असताना मंदिराच्या रक्षणासाठी विद्यार्थी रात्रभर तटस्थ, भयंकर प्रकार आला समोर


Bangladesh protest : बांगलादेशात हिंसेचा आगडोंब उसळला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशातील सत्तापालटानंतर हिंदुविरोधी हिंसाचार सुरूच आहे. ढाका येथील खिलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदूंच्या मंदिरांवर आणि घरांवर हल्ले करण्यात आले.

कट्टरवाद्यांनी घरांची तोडफोड आणि लुटमार केली. दरम्यान, हे प्रकरण वाढू लागताच लोकांनी मशिदींमधून घोषणा दिल्या की, कोणालाही इजा होऊ नये. त्याचबरोबर काही ठिकाणी मंदिरांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थी तैनात करण्यात आले असून ते रात्रभर मंदिरांवर पहारा देत होते.

बांगलादेशातील मशिदीच्या आतून लाऊडस्पीकरवर विशेष घोषणा करण्यात आली. एका व्यक्तीने लाऊडस्पीकरद्वारे सांगितले, ‘आम्ही विद्यार्थी तुम्हाला विनंती करत आहोत की, देशातील अशांततेच्या काळात आपण सर्वांनी जातीय सलोखा राखला पाहिजे.

आपण हिंदू अल्पसंख्याकांचे रक्षण केले पाहिजे. त्यांच्या जीवनाचे आणि संपत्तीचे दुष्ट शक्तींपासून रक्षण केले पाहिजे. ही तुमची, आमची आणि सर्वांची जबाबदारी आहे. याबाबत आपण सर्वांनी सावध राहूया.

दरम्यान, मशिदीतून आवाहन केल्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास ढाक्याच्या ढाकेश्वरी मंदिराबाहेर विद्यार्थी पहारा देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. त्याच वेळी, बांगलादेश जमात-ए-इस्लामीचे प्रमुख म्हणाले की, सध्या एक स्वार्थी गट कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!