भीमाशंकर अभयारण्यातील पर्यटन स्थळांवर बंदी ; काय आहे कारण?

पुणे : वन्यजीव अभयारण्य पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटावर होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन पुढील दोन महिने भिमाशंकर अभयारण्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटनस्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील एकमेव असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शिवलिंग दर्शन आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये असलेले धबधबे, पाऊस, धुके अशा सुंदर निसर्गाचा आनंद पावसाळ्याच्या दिवसात घेता येत असतो. परंतु डोंगर दर्यातून जाताना पावसाळ्यात अपघात होण्याची अधिक भीती असते. यामुळे भिमाशंकर अभयारण्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे.
भीमाशंकर अभयारण्यातील पर्यटन स्थळाच्या धोकादायक ठिकाणी जाण्यास वन विभागाकडून स्पष्ट मनाई करण्यात आली असुन सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. पावसाळ्यातील धोका लक्षात घेता पुढील काही दिवस येथे पर्यटनासाठी बंदी कायम राहणार आहे. मात्र बंदी उठल्यानंतर पर्यटकांना पुन्हा येथे निसर्गाच्या सानिध्यात येऊन फिरण्याचा आनंद घेता येणार आहे.