Ban On Medicines : महत्वाची बातमी! पॅरासिटामॉलसह ‘या’ १५६ धोकादायक औषधांवर सरकारने घातली बंदी…
Ban On Medicines : ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या १५६ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार नाहीत. ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असे सरकारने म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ‘पॅरासिटामॉल’ सह १५६ एफडीसी (फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन) औषधांवर बंदी घातली आहे. याबाबत सरकार आणि आरोग्य विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू होते.
लोकांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने काही निवडक आणि प्रसिद्ध औषधांवर बंदी घातली आहे या औषधांच्या कॉम्बिनेशनचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकत अशी माहितीही समोर आली आहे. Ban On Medicines
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याच महिन्याच्या १२ तारखेला प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सरकारने फार्मा कंपन्यांकडून वेदनाशाम औषधांच्या रूपात वापरण्यात येणाऱ्या एसेक्लोफेनाक ५० एमजी+पॅरासिटामॉल १२५ एमजी टॅब्लेटवर बंदी घातली आहे.
मोठ फार्मा कंपन्यांकडून बनवण्यात येणाऱ्या वेदनाशामक औषधांमधील प्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे. सोबतच पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिन यांच्या कॉम्बिनेशनवरही बंदी घातली आहे. याखेरीज मल्टिव्हिटॅमिनच्या काही औषधांनाही सरकारने बंदीच्या कक्षेत आणले आहे.
एफडीसी औषधे म्हणजे काय?
जी औषधे दोन किंवा अधिक औषधांचे रसायन एका विशिष्ट प्रमाण वापरून तयार केली जातात, त्यांना एफडीसी म्हटले जाते. सध्या देशामध्ये अशा औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ताप, सर्दी, ॲलर्जी, अंगदुखी, डोकेदुखी यांसारख्या किरकोळ आजारांवर ही औषधे गुणकारी म्हणून वापरली जातात.