बजरंग सोनवणे भाजपला मॅनेज!! मनसेच्या आरोपाने उडाली खळबळ…

मुंबई : निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांच्या प्रचार सभा होऊ लागल्या आहेत. या प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.

बजरंग सोनवणे हे भाजपला मॅनेज आहेत. खासदार सोनवणे यांनी मॅनेज होऊन केज मतदारसंघासह जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांवर उमेदवार दिले आहेत. यामुळेच केज
Views:
[jp_post_view]