Bajrang Punia : ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य…

Bajrang Punia : आगामी काळात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत असलेला भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा धक्का बसला आहे. तो पात्रता फेरीत पराभूत झाल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. त्याला पात्रता फेरीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेत्या बजरंगने रशियात कठोर प्रशिक्षण घेतले होते. पण तो पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि संतापला.
ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनिया अस्वस्थ झाला आहे. त्याने शेवटचा सामना न खेळताच घर गाठले. विशेष बाब म्हणजे तो तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. उपांत्य फेरीत झालेल्या दारुण पराभवानंतर बजरंगने रागाच्या भरात भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्र सोडले. Bajrang Punia

दरम्यान, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी त्याचा डोपचा नमुना घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याकडेही बजरंगने दुर्लक्ष केले. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या पराभवामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. आशियाई कुस्ती स्पर्धा ११ ते १६ एप्रिल दरम्यान आणि आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा १९ ते २१ एप्रिल दरम्यान पार पडणार आहेत.