Badlapur : बदलापूर प्रकरणात भयंकर माहिती आली समोर, शाळेतील सीसीटीव्ही फूटेज गायब, मुख्याध्यापिकाही फरार…


Badlapur : बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

अशातच आता शाळेतील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याची बाब सरकारच्या द्विसदस्यीय अहवालातून समोर आली. महिला सेविकांनी त्यांचे काम नीट केले नाही म्हणून त्यांनाही सहआरोपी बनवण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे.

पीडित मुलीच्या वैद्यकीय चाचणीला उशीर झाल्याने अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी महिला व बालकल्याण विभाग आणि शिक्षण मंत्रालयाने तयार केलेला अहवाल सोमवारी शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर शाळेतून गेल्या १५ दिवसांचे फुटेज गायब आहेत. हे फुटेज गायब का झाले आणि त्यामागचा हेतू काय आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे, असे केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सीसीटीव्ही गायब झाल्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शाळा व्यवस्थापनाकडून घटना लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा गंभीर घटनेत शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन मंडळ उदासीन असल्याचे आढळून आले.

याशिवाय, शाळेतील मुलांच्या पालकांना परस्पर शांत करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. बदलापूर शाळेतील निलंबित मुख्यधापिकेला पोलिसांनी फरार आरोपी म्हणून जाहीर केले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!