बदलापूर पुन्हा हादरलं!ट्युशनला जाताना 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; रिक्षा चालकाचा कारनामा…

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून बदलापूर मुलीवर आणि शाळकरी पोरांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे चांगलेचं चर्चेत आले आहे. त्यामुळे आधीच संतापाचे वातावरण असताना आताएका 10 वर्षांच्या चिमुरडीचा भररस्त्यात विनयभंग रिक्षा चालकाने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीचा शोध घेत त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी नेहमीप्रमाणे ट्युशनला जात होती. त्याचवेळी आरोपी रिक्षाचालकाने तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. ही घटना सहा फेब्रुवारी रोजी घडली. मात्र घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान पोलिसांनी तातडीने परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये आरोपीची रिक्षा आणि त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अंबरनाथमधून त्याला बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी रिक्षाचालकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.मुलीला रस्त्यात थांबवून आरोपीने विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या घटनेची माहिती मिळताच बदलापूरकरांनी संताप व्यक्त केला आहे.