शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंचा एल्गार ; ‘त्या ‘अटीमुळे सरकार बॅकफूटवर येणार?


नागपूर : माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी मोर्चा नागपुरात दाखल झाला असून, प्रमुख महामार्ग रोखले आहेत. बच्चू कडू नागपूरमध्येच बैठक घेण्यावर ठाम आहेत, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत येण्याचे आवाहन करत आहेत. मात्र बच्चू कडूंच्या अटीमुळे सरकार बॅकफूटवर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला विराट मोर्चा आज नागपुरात दाखल झाला आहे. या मोर्चाने नागपूर-वर्धा आणि नागपूर-जबलपूर या प्रमुख महामार्गावर ठाण मांडल्याने शहराच्या आसपासचे चार महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यावेळी शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात फोनवरुन संभाषण झाले.. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान या आंदोलनादरम्यान बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठकीच्या स्थळावरून शाब्दिक चकमक झाली. बच्चू कडू यांनी मुंबईतील बैठकीला स्पष्ट नकार देत आपली बाजू मांडली आहे.आम्ही आंदोलन सोडून मुंबईतील बैठकीला येऊ शकत नाही. नागपूरला या. नागपूरला मंत्रालय आहे, तिथे बैठक घ्या. तुम्हाला जातीयवादी मोर्चात जाता येतं, तर शेतकऱ्यांच्या मोर्चात यायला काय झाले, असा सवाल त्यांनी बावनकुळेंना केला आहे.या आंदोलनावर तोडगा कधी निघणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!