Bachchu Kadu : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरू? बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य, म्हणाले, त्यांना हटवल्यास…
Bachchu Kadu अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवल्यास त्याचं गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील, त्यांचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाहीत असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजितदादा मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. Bachchu Kadu
आमदार बच्चू कडू म्हणाले की, असे होऊ शकत नाही, पण असे झाल्यास भाजपला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, कारण एकनाथ शिंदे यांचे देखील ५ ते १० टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास तुमचे काही प्लॅन कामी येणार नाहीत.
मराठा आरक्षणानंतर धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वच समाज आक्रमक झालेत. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली की. ते म्हणाले की, सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवायला पाहिजे.
आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. कारण ते विकासावर मते घेऊ शकले नाही. आता निवडणुकीत समाजाच्या आरक्षणावर आणि जातीचे मुद्दे घेऊन मते मागितली जाणार. अशी माहिती त्यांनी दिली.