Bachchu Kadu : अजित पवार काही दिवसांत शरद पवारांकडे दिसतील!! बच्चू कडू यांनी सगळंच सांगितलं….
Bachchu Kadu : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीला रोखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. आपल्याला सोडून गेलेल्या आमदारांना घेरण्यासाठी पवारांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली असून महायुतीतील अनेक नेते पवारांच्या गळाला लागत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार काही आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. मात्र महायुतीत अजित पवारांना घेऊन सर्वकाही आलबेल आहे असे म्हणता येत नाही. कारण महायुतीतील मित्रपक्षातील नेते अजित पवारांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. मागेच संघानेही अजित पवारांवरून आक्षेप घेतला होता. Bachchu Kadu
त्यामुळे अजित पवार महायुतीत राहतात की नाही यावरून चर्चा सुरु असतानाच आता आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार शरद पवार गटात जातील, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मोठे विधान केले. आगामी काळात अजित पवार यांचे अर्ध्याहून अधिक आमदार हे शरद पवार गटात जातील.
काही दिवसांनी अजित पवारही तिकडे दिसू शकतात. त्यांना कुणीही अडवलेले नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या पारड्यात जाऊन बसायचे आणि कुणाबरोबर राहायचे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे, असे बच्चू कडू म्हणाले आहे.