Bacchu Kadu : राज्यपालांच्या निवासस्थानावरु बच्चू कडू यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, आमचा राज्यपाल ४० एकरात…

Bacchu Kadu : भाजप आणि काँग्रेसमध्ये धमक असेल तर प्राध्यापक आणि आमदाराच्या पगारी कमी कराव्यात. आमचे २५ सुद्धा आमदार आले तर आम्ही पहिले ते काम करू. गुंडागर्दी करायला कोणाच्या बापाचं राज्य नाही, असे चॅलेंज प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी थेट राज्य सरकारलाच दिलं आहे.

बच्चू कडू हे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी रोखठोकपणे भूमिका मांडली आहे. बच्चू कडू हे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी राज्यपालांच्या निवासस्थानावरुनही निशाणा साधला.
आमचा महाराष्ट्राचा राज्यपाल हा ४० एकरावर राहतो. त्याचे हात पाय किती लांब आहे हे पहावे लागेल. कष्टकऱ्यांसाठी कोणती योजना आहे का? घरी बसून खा अन् घ्या १५०० रुपये. आता आम्ही सांगणार लाडका भाऊ अन् लाडकी बहीण नाही. लाडका आमदार आणि लाडका मुख्यमंत्री, जो सर्वसामान्यांचा विचार करेल, अशी जोरदार टीका बच्चू कडू यांनी केली. Bacchu Kadu

बच्चू कडू म्हणाले, आमचे २५ जरी आमदार निवडून आले तर आम्ही प्राध्यापक आणि आमदाराच्या पगारी कमी करण्याचं पहिलं काम करू. भाजप आणि काँग्रेसमध्ये धमक असेल तर त्यांनी ती धमक दाखवावी.
प्राध्यापकाला अडीच लाख, आमदारांना तीन लाख एवढा पगार कशासाठी? एका पंक्तीमध्ये काहीच नाही तर दुसऱ्या पंक्तीमध्ये बळच टाकताय. कुणाच्या बापाचं राज्य आहे का? आम्ही मतं देतोय. त्यामुळे ही गुंडागर्दी चालणार नाही, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.
