Babar Azam : बाबर आझमवर पोलिसांची कारवाई, नेमकं प्रकरण काय?, जाणून घ्या..


 Babar Azam कराची : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची साडेसाती काही पाठ सोडेना. कारण आधी त्याला त्याचा भारतीय व्हिसा उशिरा मिळाला आणि आता पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली आहे. Babar Azam

मिळालेल्या माहिती नुसार, बाबर आझमने Babar Azam पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. पाकिस्तान ट्रॅफिक पोलिसांनी बाबरला पकडले आणि पावती फाडली, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबर आझमला गाड्यांची खूप आवड आहे. त्यामुळे त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो त्याच्या आलिशान गाड्या चालवतो.

मात्र, पुन्हा एकदा वाहतुकीचे नियम मोडून तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी बाबर आझमची पावती पाडली आहे. तो मर्यादेपेक्षा जास्त वेगाने कार चालवत होता, त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.

       

दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना बाबरला पोलिसांनी पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरे तर, या वर्षाच्या सुरुवातीला बाबर आझमच्या गाडीला नंबर प्लेट नसल्यामुळे पोलिसांनी थांबवले होते.  त्यानंतर नंबर प्लेट दुरुस्त करण्याचा इशारा देऊन सोडून देण्यात आले. यावेळी ओव्हरस्पीडिंगमुळे पोलिसांना त्याची पावती फाडावी लागली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!