Babamaharaj Satarkar Passed Away : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन, वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..
Babamaharaj Satarkar Passed Away : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ कीर्तनकार म्हणुन जगभरात त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राच्या गावागावात त्याचं किर्तन ऐकले जात होते, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचे नाव घेतले जात.
बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल. Babamaharaj Satarkar Passed Away
यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.
नेरूळ येथील त्यांच्या गावी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती आहे. बाबामहाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतले. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नसल्याने त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत.