बाबा वेंगांच्या भविष्यवाणीमुळे चिंता वाढली! पृथ्वीवर येणार महासंकट, नेमकं काय म्हणाले बाबा?


नवी दिल्ली : बाबा वेंगा आणि नोस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाण्या नेहमीच लोकांना आश्चर्यचकित करतात. त्याच्या अनेक भयावह गोष्टी प्रत्यक्षातही आल्या आहेत. त्याचप्रमाणे, आता जपानी बाबा वांगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या र्यो तात्सुकीने एक नवीन आणि चिंताजनक भाकित केले आहे.

जर एखाद्या दिवसापासून चंद्रच अस्तित्वात नसेल, तर? ही कल्पना केवळ विचित्र नाही, तर धक्कादायक आहे. आणि ही कल्पना उगाच नाही, तर जगप्रसिद्ध अंध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या एका गूढ आणि विचारप्रवृत्त करणाऱ्या भाकीताशी संबंधित आहे.

बाबा वेंगांचं आणखी एक भाकीत लक्षवेधी ठरतं – २०२५मध्ये युरोप पूर्णतः उध्वस्त होईल. त्यामागे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा राजकीय विस्कळीतपणा असू शकतो. सध्याच्या घडामोडी, विशेषतः युरोपातील युद्धजन्य आणि पर्यावरणीय संकटं, हे भाकीत काही अंशी शक्यतेच्या चौकटीत बसवतात.

दरम्यान, सर्वात भीतीदायक भविष्यवाणी म्हणजे इ.स. ५०७९ मध्ये संपूर्ण मानवजातीचा अस्त होईल. या विधानाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, मात्र बाबा वेंगाच्या विश्वासूंमध्ये या गोष्टीचा गूढतेने विचार केला जातो.

बाबा वेंगांनी भाकीत केलं आहे की इ.स. ३००० ते ५००० च्या दरम्यान, एक विशाल उल्कापिंड चंद्रावर आदळेल आणि त्याचा पूर्ण नाश होईल. चंद्राचे तुकडे होऊन तो धुळीच्या ढगात परिवर्तित होईल, अशी त्यांनी कल्पना मांडली होती. त्यांच्या या भाकितामध्ये विज्ञानाच्या कसोट्यांपेक्षा एक प्रकारची आध्यात्मिक चेतावणी दिसून येते.

चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असून त्याचा पृथ्वीवरील जीवनावर गहिरा परिणाम असतो. तो नाहीसा झाला तर त्याचे परिणाम केवळ खगोलशास्त्रीय मर्यादेत मर्यादित राहणार नाहीत, तर पृथ्वीवरील जैविक आणि पर्यावरणीय समतोलही कोलमडून पडण्याची शक्यता निर्माण होईल.

भरती-ओहोटीचा असमतोल – चंद्र गुरुत्वाकर्षणाद्वारे समुद्रांमध्ये भरती-ओहोटी घडवून आणतो. त्याच्या अनुपस्थितीत समुद्राचा व्यवहार पूर्णपणे अनिश्चित होईल. हवामानातील बदल – चंद्र पृथ्वीच्या अक्षाचा स्थैर्य राखतो. त्याचा नाश झाला, तर हवामान अधिकच अस्थिर आणि अनिश्चित बनू शकते.

प्रवासी पक्षी व प्राण्यांची दिशाभूल: अनेक जीव चंद्रप्रकाश आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून दिशा ठरवतात. त्यामुळे त्यांचं नैसर्गिक जीवनचक्र बिघडू शकतं. मानसिक आरोग्यावर परिणाम: चंद्राचा प्रभाव मानवाच्या मानसिकतेवरही असतो, आणि त्याच्या अनुपस्थितीत मानवी जीवन अधिक असंतुलित होऊ शकतं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!