Baba Siddique : मोठी बातमी! मुंबई काँग्रेसला अजून एक मोठा धक्का, बाबा सिद्दीकींचा पक्षाला रामराम…

Baba Siddique : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच मुंबई काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला राम राम केला आहे. एक्सवर पोस्ट करुन बाबा सिद्दीकी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते समजले जातात. आगामी लोकसभा निवडणुकीआधी त्यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार, ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. Baba Siddique

तसेच १० फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा होती.
I joined the Indian National Congress party as a young teenager and it has been a significant journey lasting 48 years. Today I resign from the primary membership of the Indian National Congress Party @INCIndia with immediate effect. There’s a lot I would have liked to express…
— Baba Siddique (@BabaSiddique) February 8, 2024
मी लहान वयातच काँग्रेसशी जोडला गेलो. गेल्या ४८ वर्षांपासून मी पक्षात होतो. माझा हा प्रवा मी थांबवतो आहे. कारण आज मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तातडीच्या प्रभावाने मी हा राजीनामा दिला आहे.
खरंतर मला अनेक गोष्टी बोलायच्या होत्या पण म्हणतात ना काही गोष्टींबाबत शांत राहिलेलं बरं. त्यामुळे मी शांत आहे. मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. अशी पोस्ट लिहून बाबा सिद्दीकींनी काँग्रेसला राम राम केला आहे.
कोण आहे बाबा सिद्दीकी?
झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जातात. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत.
बाबा सिद्दीकी हे १९९२ आणि १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. . २०००-२००४ या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते.