Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या निशाण्यावर पुण्याचा नगरसेवक? चौकशीत सगळ्यांनाच बसला धक्का…


Baba Siddique Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून रोज याप्रकरणात काही ना काही नवनवे खुलासे होत असतात.

या हत्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या घटनेचे पुण्यात देखील कनेक्शन समोर आले आहे. त्यानंतर आता बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या निशाण्यावर पुण्याचे एक नगरसेवकही असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या हत्या प्रकरणातील आरोपी शिवाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्याचे एक नगरसेवक असल्याचा शिवाचा दावा आहे. आता तो नगरसेवक कोण आहे, अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. Baba Siddique Murder Case

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलेल्या शूटर शिवकुमार गौतम उर्फ शिवा याने चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम याने पुन्हा एकदा त्यांच्यावर लक्ष ठेवले, गोळीबार केल्यानंतर तो पुन्हा एकदा त्या कपडे बदलून घटनास्थळी आला, त्यानंतर घटनास्थळाची स्थिती पाहत राहिला.

त्यानंतर बाबा सिद्दीकींना लिलावती रूग्णालयात दाखल केलं त्यावेळी तो त्यांच्यामागे हॉस्पिटलमध्ये गेला आणि रूग्णालयाच्या बाहेर तो जवळपास ३० मिनिटे थांबला. तो सिद्दीकी यांच्या तब्येतीची माहिती गोळा करत होता असंही त्याने चौकशी दरम्यान सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!