Ayodhya Ram Mandir : शिंदे सरकारचा मोठा निर्णय, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर..

Ayodhya Ram Mandir : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात आत्तापासूनच या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गोव्यापाठोठ महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारनेही येत्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती की, राज्य सरकारने येत्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. राज्य मंत्रिमंडळाने ही मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक काढून ही सुट्टी जाहीर केली आहे. Ayodhya Ram Mandir

दरम्यान, सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाने या प्रस्तावावर नकारात्मक प्रतिक्रिया देत, अशी कोणतीही पूर्वतयारी नसल्याने अशा कार्यक्रमासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करता येणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, अंतिम मंजुरीसाठी ही फाईल मुख्यमंत्री कार्यालयात सादर करण्यात आली. ज्यानंतर सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.