Ayodhya Ram Mandir : प्रभासने राम मंदिरासाठी दिले ५० कोटी, जेवणाचा खर्च उचलणार? काय आहे सत्य, जाणून घ्या…


Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकासाठी आता केवळ एकच दिवस उरले आहेत. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. या कार्यक्रमात ऋषी-मुनींसोबतच देशभरातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय व्यवसाय, खेळ, मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. रजनीकांत ते बिग बींपर्यंत अनेकांना या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे.

यादरम्यान, साऊथ सुपरस्टार प्रभास एका कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने अयोध्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ५० कोटी रुपये दान दिलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. काय आहे सत्य?, जाणून घेऊयात..

अयोध्येतील राम मंदिरासाठी ५० कोटी दान दिल्याबाबत प्रभासकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, पण काही रिपोर्ट्सनुसार, ही बाब खोटी असल्याचं म्हटलं आहे. तसेच प्रभासच्या टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने राम मंदिरासाठी ५० कोटी दान दिल्याची बाब फेक असल्याचं सांगितलं आहे. Ayodhya Ram Mandir

आंध्र प्रदेशचे आमदार चिरला जग्गीरेड्डी यांनी दावा केला होता की, राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठादिवशी खाण्यापिण्याचा सर्व खर्च प्रभास उचलेल. पण प्रभासच्या टीममधील सूत्रांनी ही बाब नाकारली आहे. त्याशिवाय त्यांनी, प्रभासने ना मंदिरासाठी ५० कोटी रुपयांची देणगी दिली, ना अभिषेक सोहळ्यातील जेवणाचा खर्च उचलला असल्याचं म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!