Avinash Bhosale : ब्रेकिंग! पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी जामीन मंजूर…


Avinash Bhosale : महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांशी ओळख असलेले आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

भोसले यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या गुन्ह्यात ते दोषी असल्याचे पुराव्यांतून दिसून येत नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने त्यांना दिलासा देताना प्रामुख्याने नोंदवले. ईडीने २८ जून २०२२ रोजी भोसले यांना अटक केली होती. त्यामुळे, अविनाश भोसले यांना दोन वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे.

भोसले यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात ते दोषी नाहीत, हे मानण्याची अनेक कारणे आहेत, याशिवाय, अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये भोसले यांना आधीच जामीन मंजूर झाला आहे, असेही न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी भोसले यांची जामिनाची मागणी मान्य करताना प्रामुख्याने स्पष्ट केले.

भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २६ मे २०२२ रोजी अटक केली होती, त्यानंतर, याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने भोसले यांना अटक केली होती. सीबीआयने नोंदवलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयानेच त्यांना जामीन मंजूर केला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!