ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर…!
मुंबई : क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या T20 टीमचा कॅप्टन एरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती जाहीर केली आहे. टेस्ट आणि वनडेमधून त्याने आधीच निवृत्ती घेतली होती. अचानक त्याने निवृत्ती जाहीर केली.
आता त्याने T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाला T20 टीमसाठी नव्या कॅप्टनची निवड करावी लागणार आहे. एरॉन फिंचने मागच्यावर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याचवेळी तो टी 20 क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती घेईल, असा अंदाज होता.
अखेर त्याने आता निर्णय घेतला आहे.दरम्यान, बिग बॅश लीगनंतर भविष्याबद्दल निर्णय घेईन, असं त्याने सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग संपल्यानंतर त्याने आता निवृत्तीची घोषणा केली. फिंचने आपल्या करिअरमध्ये 5 टेस्ट, 146 वनडे आणि 103 T20 सामने खेळले.
दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आहे. चार कसोटी सामन्यांची सीरीज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला आहे. ऑस्ट्रेलियन टीम भारतात असताना, त्यांच्या T20 टीमच्या कॅप्टनने निवृत्तीची घोषणा केली आहे.