धक्कादायक! एकतर्फी प्रेमात भाच्याकडून मामीचा निर्घृण खून


नाशिक : कुठेना कुठे रोज विनयभंग, मारहाण, खून केल्याच्या घटना घडतच आहेत. अशीच एक खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक मधून समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून भाच्यानेच मामीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी तांत्रिक संसाधनांचा वापर करून काही तासांतच महिलेच्या खुनाचा तपास लावला आहे. पतीने पत्नीच्या खुनाची तक्रार नाशिक रोड पोलिसांमध्ये दाखल केली असून पोलिसांनी भाच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही पती, मुले आणि भाचा यांच्यासमवेत नाशिक रोड भागातील सामनगाव परिसरात राहत होती. भाचा हा उदरनिर्वाहासाठी त्यांच्यासोबत राहत होता. ६ मार्चच्या मध्यरात्री महिलेचा तिच्या भाच्याने खून केला आहे.

एकतर्फी प्रेमामुळे मामी व भाच्यात वाद होत होते. त्याची मामी त्याला घरातून हाकलून देणार होती. याच कारणातून भाच्याने मामीच्या मानेवर चाकूने वार करत तिची हत्या केली आणि स्वत:वरही वार करून बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस तपासात हा सगळा बनाव उघड झाला आहे.

दरम्यान, संशयित भाच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलिस त्याला अटक करणार असल्याचे नाशिक रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आर. आर. शेळके यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!