पंढरपूरमध्ये विठ्ठल- रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, लाखो भाविक जमायला झाली सुरुवात…


पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त सध्या पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत आहेत. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विठुरायाची पंढरी सजली असल्याचं दृश्य सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना पंढरपुरात करण्यात आल्या आहेत. आपल्या लाडक्या विठुच्या दर्शनासाठी वारकरी आतूर झाले आहेत. यामुळे प्रशासन तयारी करत आहेत.

दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत मुक्ताई यांसारख्या अनेक पालख्या राज्यभरातून पंढरीला जाण्यासाठी निघाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

पंढरीला जाऊन युगानयुगे विटेवरी उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेला वारकरी ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता पायी प्रवास करत आहे. आता दर्शन अवघ्या काही तासांवर आले आहे.

दरम्यान, वारकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना पंढरपुरात करण्यात आल्या आहेत. मंदिरे सजवली आहेत. यामुळे आता वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!