पुणेकरांनो लक्ष द्या! १५ नोव्हेंबरपासून पैसे वाचवणारी योजना सुरू होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती…


पुणे : पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेने नागरिकांना आर्थिक सवलत देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रलंबित असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी ‘अभय योजना’ लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान ही योजना १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना थकबाकीवरील दंडात तब्बल ७५ टक्क्यांची माफी मिळणार आहे.महानगरपालिकेच्या अंदाजानुसार, या उपक्रमातून सुमारे १५० कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे.

अनेक नागरिकांनी गेल्या काही वर्षांत कर भरला नसल्याने PMC कडे एकूण १२ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मूळ कराची रक्कम ३,१५८ कोटी असून दंड आणि व्याजाची रक्कम तब्बल ९ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

या योजनेचा उद्देश म्हणजे कर थकबाकीदारांना प्रोत्साहित करून PMC च्या महसुलात वाढ करणे हा आहे. अनेक करदाते आर्थिक अडचणींमुळे मागील काही वर्षांपासून कर भरू शकले नाहीत. त्यांच्यावर मूळ करासोबतच मोठ्या प्रमाणात दंडही जमा झाला आहे. त्यामुळे, त्यांना दिलासा देण्यासाठी आणि वसुली वाढवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

दरम्यान, PMC दर महिन्याला थकबाकीवर २ टक्के व्याज आकारत होती. त्यामुळे नागरिकांवर वाढते आर्थिक ओझे निर्माण झाले होते. अभय योजनेमुळे आता नागरिकांना दंडाच्या ओझ्यातून मोठा दिलासा मिळणार आहे. हा निर्णय पुणेकरांसाठी फायदेशीर ठरणार असून PMC ला प्रलंबित रकमेची वसुली जलद गतीने करता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!