सरकारी नोकरदारांनो लक्ष द्या! सेवानिवृत्तीचं वय वाढवलं जाणार? समोर आली महत्वाची माहिती..

पुणे : महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत मोठी चर्चा होत असून, याबाबत सोशल मीडियावर विविध माहिती आणि अंदाज व्यक्त केले जात आहेत.

राज्यातील कर्मचारी संघटनांनी वारंवार निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता हा निर्णय वास्तवात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये तसेच केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या ६० वर्षे आहे.

तब्बल २५ राज्यांमध्ये हीच अट लागू आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही सरकारी कर्मचाऱ्यांना ५८ वर्षी सेवानिवृत्त व्हावे लागते. यामुळे राज्यातील कर्मचारी नाराज असून वेळोवेळी विधानमंडळ, आंदोलन आणि निवेदनांच्या माध्यमातून आपली मागणी पुढे ढकलत आहेत.

निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्ती वय वाढविण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका मांडत समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शासनबदलानंतर या विषयावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, सध्याच्या नवीन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन ही सेवा कालावधीवर अवलंबून असते. त्यामुळे अनेकांना २८ वर्षे किंवा त्याहून उशिरा सरकारी नोकरी मिळत असल्याने त्यांच्या सेवाकाळात मोठी घट होते.
अनेक कर्मचाऱ्यांचे मत आहे की केवळ १–२ वर्षे कमी सेवेमुळे पदोन्नतीच्या संधी कमी होतात. त्यामुळे करिअर आणि आर्थिक सुरक्षिततेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे आता गरजेचे असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
दरम्यान, राज्यातील लाखो कर्मचारी आता सरकारकडून अधिकृत घोषणेची अपेक्षा करत आहेत. राज्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आणि कर्मचाऱ्यांमधील वाढता असंतोष लक्षात घेता, सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या प्रशासनिक वर्तुळातही सुरू आहे.
