लक्ष द्या लाडक्या बहिणींनो! आचारसंहिता लागू, नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख काय? वाचा सविस्तर..


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

दर महिन्याला १५०० रुपये मिळणाऱ्या या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती. महिन्याचा शेवट जवळ आला असतानाही त्यांच्या खात्यात पैसे न आल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले होते.

लाडक्या बहिणींना दर महिन्यात १५०० रुपये देण्यात येतात, मात्र नोव्हेंबर महीना सूरु होऊन २० दिवस झाले, आता महिन्याचा शेवट जवळ यायला लागला तरी खात्यात पैसे जमा न झाल्याने लाडक्या बहिणी अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांच्या याच हप्त्याबबात अपडेट मोर आली आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचे, या महिन्याचे पैसे मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

नोव्हेंबर महिना सुरु होऊन १९ दिवस उलटून गेले, आजची २० तारीख आली तरी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असून आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच हे पैसे जमा केले जातील अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, त्यानुसार निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची चिन्हं आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याची अधिकृत तारीख काही अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे हे पैसे कधी मिळतात याकडे पात्र लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!