शरद पवारांनी फासे टाकायला केली सुरुवात! अजित पवारांच्या बैठकीला कमी आमदारांची हजेरी..
मुंबई : आज मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाची बैठक आहे. यामुळे या बैठकीत कोणाच्या मागे किती आमदार आहेत हे दिसणार आहे. आपल्याकडेच बहुमत जास्त आहे असा दावा दोन्ही गटाकडून सांगितले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांनी आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. परंतु वांद्रे येथील एमईटी कॉलेजच्या मैदानावर आयोजित मेळाव्यात 29 आमदारांनी हजेरी लावली. आपल्याकडे 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांचे टेन्शन वाढले आहे.
जर अजित पवार यांच्याकडे 54 आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार असतील तरच त्यांचे बंड यशस्वी होईल. अन्यथा त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार वरचढ ठरणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एमआयटीत पार पडलेल्या गुप्त बैठकीवेळी कमी आमदारांची संख्या पाहता अजित पवार यांचा चेहरा पडला होता. तसेच शरद पवार यांच्या बैठकीला अजून काही काळ बाकी आहे.
शरद पवारांची बैठक झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे आता या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत 9 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे