विमान अपघातात रेकॉर्ड झालेली माहिती बदलण्याचा प्रयत्न? रोहित पवारांचा अत्यंत गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली. याबाबत सध्या तपास सुरू असून आमदार रोहित पवार रोज नवीन माहिती समोर आणत आहेत. यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आज त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (balckbox चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे.
DGCA किंवा AAIB मधील जे कुणी याकामी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी forensic audit मध्ये हा फेरफार पकडला जाईल, याची नोंद असू द्यावी. असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

तसेच आमदार रोहित पवार म्हणाले की, उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर (जी होणारच आहे) आणि त्यात forensic audit झाले जे होणारच आहे तेंव्हा VSR कंपनीला वाचवायला कुणीही येणार नाही. तसंच DGCA मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत हेही लक्षात असू द्यावं, असेही त्यांनी सांगितले आहे.