व्हॉट्सअपच्या डीपीवर ‘तू कुत्ता है’ असा डीपी ठेवणाऱ्या तरुणावर कोयताधारी टोळक्याकडून हल्ला !


crime : व्हॉट्सअपच्या डीपीवर ‘तू कुत्ता है’ असा डीपी ठेवणाऱ्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या 19 वर्षीय तरुणावर कोयताधारी टोळक्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून सर्वजण गाड्यांवर निघून गेले.

आरिफ ऊर्फ तालीम खान (वय 23), साहिल खान (वय 20), टप्पू खान (वय 19), अयान आरिफ शेख (वय 19), गुलाम गौसखान (वय 22) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी समीर इक्चाल शेख (वय 19) यांनी तक्रार दिली. दि. 4 तारखेच्या रात्री साडेबाराच्यासुमारास फिर्यादी व मित्र अयान इरफान शेख, अस्लम, फरदीन बोलत थांबले असताना मुख्य आरोपी तालीमसह त्याचे साथीदार टोळके तेथे आले.

आरोपी तालीमचे आणि फिर्यादीच्या एका मित्राचे पूर्वीपासूनचे वाद होते तसेच व्हॉट्सअॅपवर फिर्यादीने ‘तू कुत्ता है असा डीपी ठेवल्याच्या रागातून तालीम आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने समीर शेखवर वार करत खुनाचा प्रयत्न केला. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group