सुसंस्कृत पुण्यात भयंकर प्रकार! पित्ताचा त्रास दूर करण्यासाठी महिलेवर अघोरी कृत्य, खुर्चीवर बसवलं अन्….


पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पित्ताचा त्रास दूर करण्याच्या बहाण्याने एका महिलेवर अघोरी पूजा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका ‘ज्योतिषाचार्या’चा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका पीडित महिलेला खुर्चीवर बसवण्यात आले असून, तिच्याभोवती तिघेजण उभे आहेत.

समोर एका फळ्यावर काही वाक्ये (मंत्र) लिहिलेली आहेत. ती वाक्ये वाचत हे तिघेही जण महिलेभोवती अघोरी प्रयोगासारखे काहीतरी पुटपुटत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. फळ्यावरील ते मंत्र वाचल्याने पित्ताचा विकार समूळ नष्ट होतो, असा दावा या ज्योतिषाने केला आहे.

हा प्रकार जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करणारा असून, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!