परळीत गोळीबार! परिसरात भीतीचे वातावरण, रात्री तीन राउंड फायर, कारणही आलं समोर…


बीड : चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले? म्हणून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान  परळी शहराजवळच्या कण्हेरवाडी शिवारात घडली.

काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीतून आंबेजोगाईकडून परळीकडे जात असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी विलास आघाव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, परळीपासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे, जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात. या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चारजण चहा पिण्यासाठी आले. त्यांनी हॉटेल मधील नोकरांकडे सिगारेट चे पाकीट मागितले.

हे पाकीट महाग का दिले? म्हणून या ठिकाणी ग्राहकांनी हुज्जत घातली. बाचाबाची आणि वादावादी एवढी वाढली की प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. ग्राहकांपैकी एकाने स्वतःकडील पिस्तूलातून हवेत एक राउंड फायर केला.

गोळीबाराचा आवाज ऐकून नोकरांनी हॉटेलचे शटर लावून घेतले, त्यामुळे संतापलेल्या या लोकांनी शटरवर दोन राउंड फायर केले. या प्रकरणी विलास आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!