मोठी बातमी ! अतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काउंटर…!
झांशी : उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उमेश पाल हत्याकांडात फरार माफिया अतिक अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने चकमकीत ठार केले आहे.
दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे त्यांची चकमक झाली. या चकमकीबाबत, यूपी पोलिसांनी माहिती दिली की, असदचा मुलगा अतिक अहमद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते.
या दोघांवर आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशीमध्ये डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपी एसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस होते. या दोघांकडून अनेक विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
झाशी येथे डीवायएसपी नवेंदू आणि डीवायएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीएसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत हे दोघे मारले गेले. विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत.