माफिया अतीक आणि अश्रफच्या खुन्यांना आज कोर्टात नेणार, परिसरात मोठा बंदोबस्त.


लखनौ : काही दिवसांपूर्वी माफिया अतीक आणि अश्रफची क्षणार्धात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्या लवलेश तिवारी, सनी सिंग आणि अरुण मौर्य यांना बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस कोठडीत अतिक आणि अश्रफ यांचा खून झाल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनीही सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
सध्या तिन्ही आरोपी प्रतापगड कारागृहात आहेत. अतिकच्या गुंडांच्या भीतीमुळे सोमवारीच चौघांना नैनी कारागृहातून प्रतापगडला पाठवण्यात आले. आता तेथून न्यायालयात आणले जात असताना सर्व मार्गाने सुरक्षा दल तैनात ठेवण्याची तयारी सुरू आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाचे छावणीत रूपांतर होणार आहे. त्यावेळी तपास यंत्रणांसोबत आरएएफ आणि पीएसीचे जवान असतील. आता काय निर्णय होणार हे लवकरच समजेल.