‘हक्काचे पाणी पवारांनी बारामतीला पळवले,आता एकनाथ शिंदे यांनी पाणी प्रश्न मार्गी लावला’ ; सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांची टिका…!
बारामती : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने निरा देवधर ३९७२.८२ कोटींचा उपलब्ध केला आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळणार आहे, अशी माहिती बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली आहे.
ते यासंदर्भात बोलताना म्हणाले, खंडाळा तालुक्याच्या डोळ्यादेखत आमच्या हक्काचे पाणी फलटण व बारामतीला पवारांनी पळवले होते. यापूर्वीच्या शासनाने व मख्यमंत्र्यांनी निरा देवघर प्रकल्पाला निधीला दिला नव्हता.
असे असताना शिंदे साहेबांनी आता निधी उपलब्ध करून दिला आहे. ५० वर्षे आम्ही या प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांबाबत झगडत होतो. त्यासाठी २७ पाणी परिषदा घेतल्या. मात्र याचा फायदा झाला नाही.
आमच्या हक्काचे पाणी पवारांनी फलटण व बारामतीला पळवून नेले, असेही ते म्हणाले. दरम्यान, निरा देवधर प्रकल्पाबाबत आज मुंबईत बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी ३९७६.८२ कोटींची निधी मंजूर केला आहे.
यामुळे आता खंडाळा तालुक्यातील १४ गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. हे युती सरकारचे श्रेय आहे. यामुळे आता तालुक्याला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.