कामाची बातमी! अटल पेन्शन योजनेतून मिळवू शकता ५००० रुपये महिना पेन्शन, काय आहे योजना जाणून घ्या…


मुंबई : अटल पेन्शन योजना ही सरकारची एक अशी योजना आहे ज्यामध्ये निवृत्तीनंतर पेन्शन मिळत राहते. यामुळे याचा फायदा अनेकांना होतो. या योजनेत दरमहा २१० रुपये गुंतवल्यास निवृत्तीनंतर ५,००० रुपये पेन्शन मिळेल.

यामध्ये जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा मिळतो. योजनेत २१० रुपये इतकी किमान गुंतवणूक करू शकता. ही योजना ९ मे २०१५ रोजी सुरू करण्यात आली. यंदा या योजनेला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत.

वयाच्या ६० वर्षापर्यंत या योजनेत गुंतवणूक करावी लागते. योजनेचा लाभार्थी ६० वर्षांचा होताच, त्याला ५,००० रुपये पेन्शन सुरू होते. ही पेन्शन दर महिन्याला मिळते. यामुळे निवृत्तीनंतरच्या जीवनाची सर्वांनाच चिंता असते. निवृत्तीनंतरही उत्पन्न सुरू राहिल्यास त्याचा खूप उपयोग होतो.

सरकारच्या ही अशीच योजना आहे. यामध्ये जेव्हा गौतम १८ वर्षांचा असेल आणि अटल पेन्शन योजनेत दरमहा ४२ रुपये गुंतवत असेल, तर गौतम ६० वर्षांचा झाल्यावर त्याला दरमहा रु १,००० पेन्शनचा लाभ मिळेल.

ज्यांचे खाजगी जॉब आहेत. तसेच शेतकरी आहे. त्यांना ही योजना फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या निवृत्तीनंतरची सोय तुम्ही करू शकता. मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!