Assembly Election Results : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणाचे निकाल आले, आता मुख्यमंत्री कोण होणार, भाजपकडून ‘या’ नवीन चेहेऱ्यांना मिळणार संधी?
Assembly Election Results : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले. यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. भाजप तीनमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे तर एका राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल. या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
असे असताना मध्य प्रदेशात भाजपचा बंपर विजय झाला आहे. तसेच राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही कमळ फुलले आहे. तेलंगणात मात्र 10 वर्षांपासून सुरू असलेल्या केसीआर यांच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणात काँग्रेसने विजय मिळवला.
या राज्यांसाठी भाजप किंवा काँग्रेसने आपापल्या मुख्यमंत्री चेहऱ्यांची घोषणा केलेली नाही. आता त्यांच्यापैकी मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आहे. आता मध्य प्रदेशात पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. Assembly Election Results
तसेच राजस्थानमध्ये भाजप खासदार महंत बालकनाथ हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच अलवरचे खासदार महंत बालकनाथ हे देखील नाथ समुदायातून येतात. यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे.
त्यांच्या संसदीय मतदारसंघात त्यांचे अनुयायी आणि समर्थक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे. तसेच राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. सध्या त्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत.
छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमण सिंह हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. ते एक जेष्ठ नेते आहेत. यामुळे आता भाजपकडून अंतिम निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.