पूर्व हवेलीत विकासकामे कोण करतेय ते बघा, लोकसभेला चूक केली पण विधानसभेला ती चूक दुरुस्त करा – प्रदिप कंद
उरुळीकांचन : पूर्व हवेली तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना , पीएमआरडीए , राज्य सरकार तसेच डीपीडीसीच्या भरीव निधी प्राप्त झाला आहे. मात्र तालुक्यात काही जण निधी मिळाला नाही म्हणून जिल्ह्यात खोटी ओरड करत आहे. मात्र आपल्या पाट्या लावण्यासाठी आवर्जून येत आहे.असू द्या आपण लोकसभेला चूक केली पण आता विधानसभेला चूक करू, नका असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदिप कंद यांनी हिंगणगाव (ता.हवेली ) येथे केले आहे.
पूर्व हवेली तालुक्यात मुळा मुठा नदीवरील हिंगणगाव ते खामगावटेक, टिळेकरवाडी असा जोडणाऱ्या तब्बल २१ कोटी ६८ लाख ५५ हजार रुपये पुलाचे भूमिपूजन पुणे विभागीय म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदिप कंद हे बोलत होते. कार्यक्रमास ‘यशवंत’ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, संचालक कुंडलिक थोरात,शशिकांत चौधरी, महाराष्ट्र राज्यभाजप क्रिडा विभागाचे अध्यक्ष संदिप भोंडवे, पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अलंकार कांचन , विपुल शितोळे यांच्यासह खामगाव , टिळेकरवाडी,शिंदेवाडी, जगतापवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नदीजोड पुलामुळे पूर्व हवेली
तालुक्यातील भिमानदीकाठावरील १५ हून अधिक गावांना सोलापूर
रस्त्याला जोडण्यासाठी मदत झाली आहे.
प्रदिप कंद म्हणाले, विकासाचा बाबतीत कोणीही आड न आले पाहिजे , पण विकासाचे राजकारण झाले नाही पाहिजे, पण हवेली तालुक्यासाठी निधीच मिळत नाही अशी ओरड पसरवली जाते.मात्र भूमिपूजन व उद्घाटने काही जण पाट्या लावण्यासाठी येत आहे. चला असे पण होऊ द्या पण निधी मिळत नाही खोटे राजकारण
करणे दुर्दैवी आहे. हवेली तालुक्यात महायुतीच्या माध्यमातून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, संदिप भोंडवे , सुभाष जगताप यांच्या माध्यमातून निधी टाकला जात आहे. आम्ही विकास
करतोय पण जनता मात्र दुसऱ्यालाच मदत करीत आहे. लोकसभेत काम करणाऱ्या माणसाला निवडून देण्यात चूक झाली तशी चूक विधानसभेला करु नका आपण पूर्व हवेलील सर्व विकासाचा रोडमॅप भरुन काढू असा विश्वास प्रदिप कंद यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात शिवाजी आढळराव पाटील, सुभाष जगताप, संदिप भोंडवे यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.